IRCTC ने रेल्वेच्या रिझर्व्हेशनसाठी सुरु केली नवीन सुविधा

IRCTC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : आता प्रवासासाठी कुठे जायचे असेल तर रेल्वेसाठी रिझर्व्हेशन करणे आधीपेक्षा सोपे झाले आहे. आता लोकांना आयआरसीटीसीची वेबसाईट किंवा इतर कोणत्याही App वर न जाताही रिझर्व्हेशन करता येईल. हे लक्षात घ्या कि, लोकांच्या सोयीसाठी IRCTC कडून चॅटबॉटद्वारे रिझर्व्हेशन करण्याची सुविधा नुकतीच लाँच करण्यात आली आहे. IRCTC कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने लोकं चॅटबॉटच्या सुविधेचा लाभ घेत आहेत.

Ask DISHA Powered By CoRover®

आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून दररोज 10 लाखांहून जास्त तिकिटे बुक केली जातात. याशिवाय प्रवासी स्टेशनवर जाऊन तसेच इतर Apps द्वारे देखील तिकीटे बुक केली जातात. लोकांना तिकीट बुक करताना होणाऱ्या त्रासापासून दिलासा देण्यासाठी IRCTC कडूनचॅटबॉटद्वारे आरक्षणाची सुविधा लाँच करण्यात आली आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर लॉग इन करण्याचीही गरज भासणार नाही. IRCTC च्या मते, लोकांकडून चॅटबॉटला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

Powered by Microsoft Azure and developed by CoRover, IRCTC's AI chatbot AskDISHA enhances user experience

मात्र या सुविधेसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटप्रमाणेच सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल. यामध्ये UPI द्वारे स्लीपर क्लाससाठी 10 रुपये आणि एसी क्लाससाठी 15 रुपये द्यावे लागतील. तसेच इतर कोणत्याही पेमेंट मोडद्वारे स्लीपर क्लाससाठी 20 रुपये आणि AC क्लाससाठी 30 रुपये द्यावे लागतील.

Ask DISHA Powered By CoRover®

आता रेल्वेच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान यापुढे केटरिंगमध्ये कोणताही त्रास होणार नाही. आता प्रवाशांना WhatsApp द्वारे कोणत्याही स्टेशनवरील त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करता येईल. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून प्रवाशांच्या सोयीसाठी WhatsApp फूड डिलिव्हरी सिटीम लाँच करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, याआधी जवळपास 100 रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता ही सुविधा यशस्वी झाल्यानंतर आणखी जवळपास 500 स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, नवीन दर पहा

‘या’ Multibagger Stock ने फक्त 5 आठवड्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट

iphone वरून अँड्रॉइड फोनवर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरा ‘हे’ Apps

Multibagger Stock : ‘या’ केमिकल फार्मा कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये केली 290 पट वाढ