IRCTC ची नवीन वेबसाइट आज लाँच होणार, आता सेकंदात तिकिटे बुक केली जातील, सोबत ‘हे’ नवीन फीचर्सही उपलब्ध असतील

Railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । IRCTC वेबसाइटवर लाखो लोकं दररोज तिकिट बुक करतात, अशा परिस्थितीत ही ई-तिकीट वेबसाइट हँग किंवा स्लो होते. ज्यामुळे बर्‍याच वेळा चुकीची तिकिटे आरक्षित होता होता चुकली जातात. परंतु भारतीय रेल्वे (Indian Railways) IRCTC ई-टिकटिंग वेबसाइट आणि अ‍ॅप हे दोन्ही अपग्रेड करणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आज ही नवीन वेबसाइट लाँच करणार आहेत. या नवीन वेबसाइटवर तिकिट बुकिंगची अधिक फ्रेंडली फीचर्स असतील. बुकिंग देखील बर्‍याच बदलांसह आणखी वेगवान होईल.

वेबसाइट अपग्रेड केल्यामुळे तिकिटांचे बुकिंग सहज केले जाईल

  • रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे की, आयआरसीटीसीची वेबसाइट आणि अ‍ॅप अपग्रेड केल्यानंतर प्रवाशांना पूर्वीच्या तुलनेत जलद आणि कोणत्याही अडचणीशिवाय तिकीट बुक करता येणार आहे.

  • भारतीय रेल्वेने सांगितले की, आम्ही आमच्या ई-तिकीट वेबसाइटमध्ये यूझर पर्सनलायजेशन आणि फॅसिलिटी वाढवण्याचे काम करीत आहोत.

  • आयआरसीटीसीच्या या नवीन वेबसाइटमध्ये प्रवाश्यांसाठी अधिक चांगले फीचर्स असतील, ज्यामुळे तिकिट बुकिंग सुलभ होईल.

  • तिकीट बुकिंगसह जेवण बुक करण्यासाठी स्वतंत्र फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने आपण आपल्या आवडीचे खाद्य बुक करू शकता.

  • लोड जास्त असला तरीही वेबसाइट हँग होणार नाही.

  • वेबसाइटवर पूर्वीपेक्षा जास्त जाहिराती असतील, म्हणून आयआरसीटीसीलाही अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

  • नवीन वेबसाइटवरून दर मिनिटाला 10,000 हून अधिक तिकिटे बुक केली जातील. यापूर्वी दर मिनिटाला 7500 तिकिटे बुक केली जात होती.

https://t.co/HMgMnDYZbk?amp=1

आयआरसीटीसीतर्फे ‘Book now pay later’ ही नवीन सुविधा सुरू
आयआरसीटीसीने नवीन पोस्ट पेड पेमेंट ऑप्शन सुद्धा सादर केला आहे. या सुविधेद्वारे नंतर आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन तिकिटे बुक करून तिकिटे भरता येतील. यात, प्रवासी ई-पेमेंटद्वारे 15 दिवसांच्या आत तिकिट बुक करू शकेल आणि पैसे भरू शकेल किंवा तिकीट मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत पैसे भरतील.

https://t.co/2AnzZ3lcoA?amp=1

रेल्वे तिकीट वेबसाइट इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देते. रेल्वेच्या म्हणण्यानुसार 2014 पासून तिकीट बुकिंग तसेच प्रवाशांच्या सोयीसुविधात सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. आयआरसीटीसी वेबसाइट ही रेल्वेने प्रवास करणार्‍या नागरिकांची पहिली लिंक आहे. रेल्वेच्या ई-तिकीट वेबसाइटचे उद्दीष्ट प्रवाश्यांना त्यांच्या रेल्वे प्रवासासाठी संपूर्ण सुविधा पुरविणे आहे.

https://t.co/Iu6oTXkdLL?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.