बीड प्रतिनिधी | शेख अनवर
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखाना हायवे पासून पवारवाडी, टाकळी पर्यंत दलदलयुक्त रस्त्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. कारण कारखान्यापर्यंतचा रस्ता दलदलयुक्त झालेलाआहे. ऊस वाहन धारकास वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्या कारखान्यात जायला फक्त अर्धा तास लागतो. त्या कारखान्यात जायला सध्या दोन ते तीन तास लागत आहे. कारण अवकाळी पावसाने तेथील रस्ता चिखलयुक्त झाला आहे. त्यामुळे वाहने चिखलात फसत आहेत. ऊसतोड मजूर, वाहनचालक व ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यात जिवंत पोहोचतील का याची भीती वाटत आहे.
घरून निघतांना सर्वांच्याच पोटात गोळा येत आहे. म्हणून सर्वच परिसरातील नागरिकांकडून भीती व्यक्त होत आहे की, एखादा मोठा अपघात होऊन कुणाच्या जीवाच बर वाईट होऊ नये म्हणून कारखाना प्रशासनाने लवकर जागृत होत रस्त्याचा प्रश्न लवकर निकाली काढावा. अन्यथा निष्पाप लोकांचा बळी गेल्यास तुम्हीच त्याचे गुन्हेगार असाल!
जय महेश साखर कारखाना पर्यंतचा रस्ता पाहिल्यास असे जाणवते की, सदरील कारखाना साखरेचा आहे की माणसे मारून टाकण्याचा? कारखाना प्रशासन आणि एमडी याकडे लक्ष घालतील का? एखादा अपघात होण्याची तुम्ही वाट पाहत आहात काय? उत्तर द्या!
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.