हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जुहूच्या इस्कॉन मंदिरात शॉक लागून एका पुजाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रद्युम्न नाथ असे या मृत पुजाऱ्याचं नाव आहे. चालू पंखा स्वत:च्या दिशेने फिरवायला गेले असता त्यांना विजेचा धक्का लागला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जुहू येथील इस्कॉन मंदिरात राम नवमी निमित्त पूजा आणि भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानिमित्त मंदीर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी गरम होत असल्याने प्रद्युम्न नाथ हे गार्डन परिसरातील पंखा स्वत:च्या दिशेने फिरवायला गेले. मात्र, यावेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. या दुर्घटनेत पुजारी नाथ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
Maharashtra | A devotee died due to electrocution at ISKCON temple in the Juhu area of Mumbai. Police arrested the contractor after registering a case of negligence. Further investigation underway: Juhu Police
— ANI (@ANI) April 11, 2022
याप्रकरणी कंत्राटदारावर तेजराज कश्यप यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.