हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या जोरदार युद्ध (Israel-Hamas War) सुरु यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत असून हे युद्ध नेमकं कधी संपेल हे सांगणं कठीण आहे. कारण इस्राईल आणि पॅलेस्टीन हा वाद दोन्ही देशांपुरता मर्यादित नाही कारण ह्याच्या युद्धाच्या मुळाशी दोन प्रमुख धर्मांमधील वाद आहे. अमेरिका इस्राईलला मोठा पाठिंबा देते. तसेच अरब राष्ट्र मुस्लिम बहुल असलेल्या पॅलेस्टीनला आपला पुर्ण पाठिंबा देतात. यामुळे संपूर्ण जग दोन भागात विभागताना दिसून येत आहे.
इस्रायलला कोणाकोणाचा पाठिंबा?
इस्रायलच्या पाठिंब्यासाठी अमेरिका नेहमीच अग्रेसर असते . त्यातच युरोपातील फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी सारखी राष्ट्र देखील इस्राइल देशाला पाठिंबा देतात. त्याचबरोबर भारताचे इस्राइलचे असलेले उत्तम हितसंबंध लक्षात घेऊन भारत देखील इस्राइला आपला पाठिंबा दर्शवताना दिसून येत आहे. मात्र मध्य आशिया मधील अरब राष्ट्र सौदी अरेबिया, इराण, पाकिस्तान, सारखे देश पॅलेस्टाईनचे समर्थन करतात .
पॅलेस्टाईनला कोणाचे समर्थन –
रशिया आपले इराण व मुस्लिम बहुल राष्ट्राशी असलेले हिटसंबंध जपण्यासाठी पॅलेस्टाईनला समर्थन देताना दिसून येत आहे. त्याचबरोबर चीन देखील IMEC मुळे बेल्ट आणि रोडच्या महत्वाकांशी प्रकल्पाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन पॅलेस्टाईनला समर्थनात बोलताना दिसून येत आहे. यामुळे जग दोन गटात विभागले आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. इस्राइलने जर गाझा पट्टीमध्ये घुसून गाझापट्टी बळकवण्याचा प्रयन्त केला तर अरब राष्ट्र देखील इस्राएल विरोधात मोठी कृती करताना दिसून येतील. यासर्व बाबीला रशिया, चीन व इराण सारखे देश मोठे स्वरूप देऊ शकतात .