नवी दिल्ली । दिग्गज आयटी कंपनी विप्रो (Wipro) च्या शेअर्स मध्ये गुंतवणूक चांगली आहे. विप्रो ने मंगळवारी सांगितले की कंपनीच्या शेअर्सची बायबॅक करणे सुरू आहे. ही ऑफर 29 डिसेंबर रोजी सुरु होणार आणि पुढच्या वर्षी 11 जानेवारी 2021 रोजी बंद होणार. कंपनीने मेट्रो एजी बरोबर स्ट्रॉटेजिक डिजिटल आणि आयटी डिल साइन केली आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या भागधारकांनी विप्रोच्या बायबॅक प्लानला मंजुरी दिलेली होती. या प्रोग्रॅम अंतर्गत 400 रुपये प्रति शेअर दराने 23.75 कोटी इक्विटी शेअर्सची खरेदी करेल ज्याचे मूल्य 9500 कोटी रुपये असेल.
26 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवणार
कंपनीने याबाबतची माहिती नियमकाच्या फायलिंग मध्ये दिली आहे. या फायलिंग नुसार बायबॅक 29 डिसेंबर 2020 रोजी सुरु होईल आणि पुढील वर्ष 11 जानेवारी 2021 रोजी बंद होईल. स्टॉक एक्सचेंज बिड्स चा अखेरचा सेटलमेंट 20 जानेवारी किंवा त्यापूर्वी होईल. विप्रो 26 डिसेंबर, 2020 किंवा त्यापूर्वी आपल्या गुंतवणूकदारांना लेटरद्वारे प्रस्ताव पाठवेल.
एक्सपर्टचे काय मत आहे
जानकर, विप्रोच्या बायबॅक ऑफरला इतरांच्या तुलनेत चांगले असल्याचे सांगत आहेत आणि रिटेल स्टॉकहोल्डर्सचे शेअर्स विकून शॉर्ट टर्म प्रॉफिट कमावण्याचा सल्ला देतात. तसे पाहता, याचा बायबॅक प्राइस बाजार भावा पेक्षा जास्त आहे आणि गुंतवणूकदारांच्या आपल्या जवळ ओढण्यासाठी तेवढे पुरेसे आहे.
गेल्या वर्षीदेखील विप्रो ने केले शेअर बायबॅक
विप्रोने 2019 मध्ये देखल शेअर बायबॅक केले. त्या वेळी आयटी कंपनी 325 रुपये प्रति इक्विटी शेअर्स भावाने 32.31 कोटी शेअरचे बायबॅक केले. या प्रोग्रॅम अंतर्गत विप्रोने 10,500 कोटी शेअर्स बायबॅक केले.
याआधी TCS ने आणली होती बायबॅक ऑफर
आयटी कंपनी विप्रोची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेज (TCS) ने शेअर्स बायबॅक करण्याची गोधन केली. टीसीएस 3 हजार रुपये प्रति इक्विटी शेअर्सच्या भावाने शेअर बायबॅक करत आहे. याचे मूल्य 16 हजार कोटी रुपयांचे आहे. कंपनीच्या या ऑफर अंतर्गत 18 डिसेंबर पासून शेअर बायबॅक मध्ये भाग घेतला जाऊ शकतो. गुंतवणूकदारांसाठी ही ऑफर आगामी वर्ष 1 जानेवारी रोजी बंद होईल.
दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे
टीसीएसच्या शेअर्सचे भाव मार्चच्या अंतिम हप्त्यावरील भावाने 60 टक्क्यांच्या वर सुरु आहे. तर दुसरीकडे विप्रोच्या शेअर्सची किंमतही या काळात दुप्पट झाली आहे. हे शानदार परफॉर्मेंस पाहून गुंतवणूकदारांना वाटेल कि, दोन्ही कंपन्यांच्या बायबॅक ऑफरमध्ये पार्टिसिपेटकरून एडिशनल रिटर्न मिळू शकेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.