धक्कादायक! मागील २४ तासात इटलीत ३०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रोम वृत्तसंस्था | जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील २४ तासात एकट्या इटलीत एकुण ३६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे इटली मध्ये खळबळ उडाली असून रविवारचा दिवस चिंता वाढवणारा ठरला आहे.

इटली मध्ये एकट्या रविवारी एकुण ३५९० नवे कोरोना रुग्न सापडले आहेत. यामुळे आता इटलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या २४,४४७ वर पोहोचली आहे. इटलीसोबतच इराण मध्येही चिंताजनक वातावरण आहे. इराणमध्ये रविवारी १२०९ नवीन कोरोनाग्रस्त सापडले असून एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा १३९३८ वर पोहोचला आहे. इरान मध्ये एकट्या रविवारी ११३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान चीन ने मात्र कोरोनाचा फैलाव थांबवण्यात यश मिळवले आहे. चीन मध्ये केवळ २५ नवीन कोरोनाग्रस्त रविवारी सापडले असून तेथील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ८०८४९ आहे. जगभरात आता एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या १.५० लाख इतकी झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा..

धक्कादायक! पोलीस पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

हुश्श…! कोरोनासोबतच्या लढाईत भारत यशस्वी ; उपचारानंतर ११ रुग्ण ठणठणीत

पत्नीला कोरोनाव्हायरस झाल्यामुळे पंतप्रधान जस्टीन त्रुडो करणार ‘वर्क फ्रॉम होम’

डॉक्टर कडे न जाता करोनाव्हायरस मधून बऱ्या झालेल्या महिलेचा अनुभव! तिच्याच शब्दात

मोठी बातमी! अमेरीकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

Leave a Comment