हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा झटका बसला आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि लिंगायत समाजाचे प्रभावशाली नेते जगदीश शेट्टर यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी सुदधा भाजपवर नाराज होऊन काँग्रेसचा झेंडा हातात घेतला होता. त्यातच आता शेट्टर यांनीही काँग्रेस प्रवेश केल्यामुळे कर्नाटकात भाजपसाठी अडचणी वाढल्या आहेत.
भाजपने तिकीट न दिल्याने जगदीश शेट्टर नाराज झाले होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला रामराम ठोकला होता. आज त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते सिद्धरामय्या, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी ते म्हणाले, काल मी भाजपचा राजीनामा दिला आणि आज मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. एक विरोधी पक्षनेता, माजी मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष काँग्रेसमध्ये सामील झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. भाजपने मला प्रत्येक पद दिले असून पक्षाचा कार्यकर्ता असल्याने मी नेहमीच पक्षाच्या विकासासाठी काम केले होते असे त्यांनी म्हंटल.
कल मैंने भाजपा से अपना इस्तीफा दिया और आज मैं कांग्रेस पार्टी में शामिल हो रहा हूं। एक विपक्षी नेता के रूप में कई लोग हैरान हैं, पूर्व CM और पार्टी अध्यक्ष कांग्रेस में शामिल हो रहे हैं। भाजपा ने मुझे हर पद दिया है और पार्टी कार्यकर्ता होने के नाते मैंने हमेशा पार्टी के विकास के… pic.twitter.com/6UunwhPE4h
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2023
ते पुढे म्हणाले, खरं तर ज्येष्ठ नेता असल्यामुळे मला तिकीट मिळेल असे वाटले होते, पण तिकीट मिळत नसल्याचे कळताच मला धक्का बसला. माझ्याशी कोणी बोलले नाही, मला पुढे कोणते पद मिळेल याची खात्रीही कोणी दिली नाही असं म्हणत त्यांनी भाजपवरील आपली नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, जगदीश शेट्टर हे कर्नाटकातील दिग्गज नेते असून आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी ते ओळखले जातात. शेट्टर हे हुबळी-धारवाड (मध्य) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आत्तापर्यन्त त्यांनी तब्बल सहा निवडणुका जिंकल्या आहेत. २०१२ ते २०१३ या कालावधीत त्यांनी कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. यापूर्वी 2018 मधील विधानसभा निवडणूकीत त्यांनी 21,000 पेक्षा जास्त मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपसाठी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण आव्हान बनलं आहे.