जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावात दूध फेडरेशनवर (Milk Federation) शुक्रवारी रात्री तुफान राडा झाला. दूध फेडरशेनच्या टँकरवर काम करणाऱ्या एका टँकर चालकाचं शुक्रवारी सकाळी अपघाती निधन झाले. यानंतर या टँकरच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून दूध फेडरेशनबाहेर (Milk Federation) ठिय्या आंदोलन केले. यावेळी मृत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेह घेऊन दूध फेडरशनबाहेर आले होते. त्यांनी मृतदेह घेऊन आतमध्ये घुसण्याचा प्रयत्नसुद्धा केला. यावेळी पोलीस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये यांच्यात धक्काबुक्की झाली. त्या ठिकाणी मोठी गर्दी जमल्याने ती पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीजार्च करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
जळगावात दूध फेडरेशन कार्यालयाबाहेर तुफान राडा pic.twitter.com/Qbp9VbsX7a
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 14, 2022
काय आहे नेमके प्रकरण ?
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली होती. यानुसार दुध शिफ्ट करण्याचे काम सुरू असतांना अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक त्या पाठोपाठ दोन कारने अशा चार ते पाच भरधाव वाहनांनी दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला जोरदार धडक दिली. या अपघातात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
यानंतर मृत टँकर चालकाच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी नातेवाईकांनी शिवाजी नगरातील दूध फेडरेशनसमोर (Milk Federation) ठिय्या आंदोलन केलं. यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी टँकर चालकाचा मृतदेह देखील आणला होता. जोपर्यंत आम्हाला नुकसानभरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही प्रेत हलविणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. यावेळी दूध फेडरेशन प्रशासनाने मृत टँकर चालकाच्या कुटुंबियांशी संवाद साधून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी दूध फेडरेशनमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना परमनंट नोकरी मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
हे पण वाचा :
आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या
KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर
NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक
एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल