सोलापूरमध्ये मोहोळजवळ टेम्पो व जीपचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून येणाऱ्या पिकप जीपने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. देवडी गावच्या शिवारात हॉटेल श्रीकृष्ण जवळ शुक्रवारी पहाटे 5 वाजता हा अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात रिजवान अब्दुल गणी शेख आणि रिहान फैजल कयेशअल्ली या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालक चेतन बिभीषण खंदारे यांच्या तक्रारीवरून मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात पथकाचे ज्योतिबा पवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय घडले नेमके ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणहून सोलापूरकडे घरचे सामान घेऊन आयशर टेम्पो चालला होता. यादरम्यान शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास देवडी गावातील शिवारात श्रीकृष्ण जवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा केला होता. यादरम्यान पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप गाडीने आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली.

या अपघातात (Accident) रिजवान अब्दुल गणी शेख आणि रिहान फैजल कयेशअल्ली हे दोघे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातातील जखमी व्यक्तींना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आयशर टेम्पोचा चालक चेतन बिभीषण खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा 
एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

ठरलं तर! विद्यापीठात ‘या’ तारखेपासून लागणार उन्हाळी सुट्टया

नेदरलँडची महिला क्रिकेटपटू बाबेट डी लीडेने केला ‘हा’ विश्वविक्रम, MS धोनीलाही टाकले मागे

3 IPL टीमकडून खेळलेल्या ‘या’ भारतीय खेळाडूवर गुन्हा दाखल

Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील आपल्या FD च्या व्याजदरात केली वाढ