जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. हि जिल्हा दूध संघाची निवडणूक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कारण या जिल्ह्यात मागच्या काही काळापासून गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. त्यामुळे हि निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यादरम्यान आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील यांना खोक्यावरून डिवचले होते. त्यावरून आता गिरीष महाजन यांनी खडसेंवर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले गिरीश महाजन?
जळगाव जिल्हा दूध संघात तुम्ही सात वर्षात काय दिवे लावले तूप खाल्लं, लोणी खाल्लं त्यामुळे खडसेंनी पराभवाचे कारण शोधू नये असा पलटवार गिरीश महाजन यांनी खडसेंवर केला. सगळे लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत तुम्ही सात वर्षात काय दिवे लावलेले सर्व जनतेला माहिती आहे. तुमचे काही लोक जेलमध्ये अटकेत आहेत त्यामुळे तुम्ही आता काही म्हणाला तर तुमचा पराभव हा अटळ आहे. लोकांनी ठरवलं आहे तुम्हाला दूध संघातून बाहेर काढायचं आहे. असा टोलादेखील गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) लगावला आहे.
खडसेंवर नोकरी भरती घोटाळ्याचे आरोप
या निवडणुकीआधी जिल्हा दूध संघातील नोकर भरती प्रकरणातील गैरव्यवहाराच्या अनेक ऑडिओ क्लिप माझ्याकडे असल्याचं सांगत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना इशारा दिला होता. माझ्या विरोधातील व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग असेल तर त्याचा निवडणुकीत वापर करणार कर ना… असा एकेरी उल्लेख करत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना या आरोपावरून जोरदार प्रत्युत्तर दिले होते. सध्या या नेत्यांमधील आरोप- प्रत्यारोप पाहता हि निवडणूक खूप प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे येणाऱ्या काळात कळेलच.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या