लाखो रुपये असलेली बॅग फेकून सहाय्यक निबंधकाचा पोबारा

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना प्रतिनिधी । अंबड शहरातील रजिस्ट्री ऑफिस कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक निबंधक आपल्या कार मध्ये कापडी बॅग ठेवत असताना बॅग मधून पैशाचे बंडल खाली पडल्याने त्यांना पैशाची बंडल खाली पडल्याची विचारणा केली असता साह्यक निबंधकाने पेशाने भरली बॅग तशीच खाली फेकून पळ काढल्याची घटना अंबड शहरात निबंधक कार्यालयाच्या आवारात घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड निबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक काळे हे कार मध्ये बॅग ठेवत असताना त्यातून एक पैशाचे बंडल जमिनीवर पडल्याचे तेथे उपस्थित माजी नगरसेवक प्रकाश नारायणकर यांनी विचारणा करताच काळे यांनी पैशाची बॅग खाली फेकत पळ काढला.

हा सर्व प्रकार पाहता माजी नगरसेवक नारायणकर यांनी पैशानी भरलेली बॅग उचलून अंबड पोलिसांच्या ताब्यात दिली असता बॅग मध्ये तब्बल 5 लाख 70 हजारांची रोकड आढळून आली. रजिस्ट्री ऑफिस कार्यालयात कार्यरत असलेले काळे यांनी इतकी मोठी रक्कम टाकून अचानक पळ काढल्याने हे पैसे नेमके कुठून आले? काळे यांनी पैशाची बॅग सोडून पळ का काढला ? अशा अनेक चर्चाना परिसरात उधाण आले आहे. पोलिस संबंधीत पैसे कुठून आणि कसे आले यांचा अधिक तपास करीत आहे.