Jalna Mumbai Vande Bharat : जालना- मुंबई वंदे भारतला मिळणार 4 थांबे; पहा कोणकोणत्या स्थानकावर थांबणार

Jalna Mumbai Vande Bharat Halts
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jalna Mumbai Vande Bharat | अत्यंत कमी कालावधीत भारतीयांच्या पसंतीस पडणारी ट्रेन म्हणजे वंदे भारत. आता ही ट्रेन देशाच्या प्रत्येक ठिकाणी असावी असे सर्वांनाच वाटत आहे. त्यामुळे या ट्रेनला प्रत्येक ठिकाणी पोहचवण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्न करत आहे. गेल्या काही महिन्यात देशाच्या कानाकोपऱ्यात नवनव्या वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता येणाऱ्या काही दिवसात मुंबई ते जालना वंदे भारत ट्रेन सुरु होणार असून महाराष्ट्र आणि खास करून मराठवाड्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कि ही वंदे भारत एक्सप्रेस नेमकं कोणकोणत्या ठिकाणी थांबणार आहे ….

कुठे असतील हे थांबे?

जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला (Jalna Mumbai Vande Bharat) एकूण ४ थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मनमाड आणि ठाणे या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. या चारही रेल्वे स्टेशनवर ही वंदे भारत एक्सप्रेस २ मिनिटे थांबेल. त्यामुळे या स्थानकावरील प्रवाशांना याचा मोठा फायदा होण्यास मदत होईल आणि त्यांचा प्रवासही सुखकर होईल यात शंका नाही.

कसे असेल या गाडीचे वेळापत्रक? Jalna Mumbai Vande Bharat

जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन सकाळी 5.05 वाजता जालना येथून निघणार असून ती सकाळी 5.53 वाजता छत्रपती संभाजीनगरला पोहचेल. तर नाशिकला सकाळी 8.38 वाजता, ठाणे रेल्वे स्टेशनवर सकाळी 11.10 वाजता आणि मुंबईला 11.55 वाजता पोहोचेल. त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन मुंबईहून दुपारी 1.10 वाजता निघेल आणि ठाणे येथे दुपारी 1.40 वाजता, नाशिकला 4.28 वाजता, औरंगाबादला 7.08 वाजता आणि जालना येथे रात्री 8.30 वाजता पोहोचेल.

वर्षाअखेर दाखवला जाईल गाडीला हिरवा झेंडा

एससीआरच्या नांदेड विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी सांगितले की, ही ट्रेन शुक्रवार वगळता इतर सर्व दिवशी धावेल. तसेच छत्रपती संभाजीनगरहुन मुंबईला जाण्यासाठी जवळ जवळ सहा तास लागण्याची अपेक्षा आहे. असे त्यांनी सांगितले. जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (Jalna Mumbai Vande Bharat) ही एक्सप्रेस वर्षा अखेर धावण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. या ट्रेनचे मराठवाड्यात आगमन झाल्यावर याचा फायदा पर्यटनाला होणार हे नक्की.