जनता कर्फ्यू: योगी आदित्यनाथ सरकार कामगारांना देणार १ हजार भत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसची धास्ती आता सर्वांनीच घेतली आहे. शासन पातळीवर प्रत्येक राज्य वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता कर्फ्युच्या अंमलबजावणीचा विचारही शासन काटेकोरपणे करत आहे.

श्रमजीवी, कष्टकरी लोकांचं या काळात होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने विशेष योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत २० लाखहून अधिक श्रमिकांच्या खात्यावर डीबीटी योजनेतून १ हजार रुपये तात्काळ ट्रान्सफर करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment