हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jandhan Account : केंद्र सरकार कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. प्रधानमंत्री जनधन योजना ही त्यांपैकीच एक योजना आहे. जन धन खाते धारकांना अनेक सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात. केंद्र सरकार कडून प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट उघडण्याची सुविधा मिळते. यामध्ये अपघाती विमा, ओव्हरड्राफ्टची सुविधा, चेकबुक यासारखे इतरही अनेक फायदे दिले जातात.
या जन धन योजनेअंतर्गत, आता आपल्या खात्यामध्ये बॅलन्स नसेल तरीही 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. हे लक्षात घ्या कि, ही सुविधा कमी कालावधीच्या कर्जासारखीच आहे. यामध्ये 5 हजार रुपये असलेली ही रक्कम वाढवून आता सरकारने 10 हजार रुपये केली आहे. Jandhan Account
यासाठीचे नियम जाणून घ्या
मात्र, ही ओव्हरड्राफ्ट सुविधा घेण्यासाठीची जास्तीची वयोमर्यादा 65 वर्षे आहे. त्याचप्रमाणे याचा लाभ घेण्यासाठी आपले जन धन खाते (Jandhan Account) कमीत कमी 6 महिने जुने असावे लागेल. मात्र तसे नसेल तर फक्त 2 हजार रुपयांपर्यंतचाच ओव्हरड्राफ्ट मिळेल.
जन धन खाते म्हणजे काय???
हे जाणून घ्या कि, प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हा बँकिंग/सेव्हिंग आणि डिपॉझिट्स अकाउंट, पैसे पाठवणे, लोन, इन्शुरन्स, पेन्शनमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठीचा केंद्र सरकारचा एक सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रम आहे. तसेच कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसायिक प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटमध्ये जन धन खाते उघडता येते. या अंतर्गत झिरो बॅलन्स अकाउंट उघडता येतात. Jandhan Account
अशा प्रकारे उघडा जन धन खाते
भारतात राहणाऱ्या 10 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या कोणत्याही नागरिकाला जन धन खाते (Jandhan Account) उघडता येते. तसेच या योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वाधिक खाती उघडली जातात. मात्र, आपल्याला खाजगी बँकेतही जन धन खाते उघडता येऊ शकेल. तसेच जर आपल्याकडे दुसरे एखादे बचत खाते असेल तर आपल्याला ते जन धन खात्यामध्ये रूपांतरित करता येईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://pmjdy.gov.in/
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 247 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर
DCB Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळेल 8.35% व्याज
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा