Wednesday, February 1, 2023

फालतू बडबड करू नये, नाही तर पूर्वीचे दिवस येतील…; भाजप नेत्याचा राऊतांना थेट इशारा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “संजय राऊत यांनी व त्यांचे चालक मालक पालक ज्यांच्याकडे ते नोकरी करतात त्या उद्धव ठाकरेंनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? राऊतांनी वायफळ आणि फालतू बडबड करू नये. नाही तर पूर्वीचे दिवस येतील, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर दिला आहे.

नागपूर येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी आज भाजप नेत्यांना ‘सामना’तून सवाल केला. यावरून आज भाजप नेते भातखळकर यांनी माध्यमांशी संवाद साधत पलटवार केला. ते म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणाचा तपासच केला नसल्याचं सीबीआयने म्हटलं आहे.

- Advertisement -

तरीही या प्रकरणात सीबीआयने क्लिनचीट दिल्याचं काही लोक सांगत आहेत. त्यातून त्यांचा खरा चेहरा दिसत आहे. दिशाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन झाल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे. हे सरकार दिशा सालियनला न्याय मिळवून देईलच, असे भातखळकर यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज ‘सामना’तील रोखठोक सदरातून भाजपला डिवचले आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांची मते त्या मांडत असतात. आता त्यांनी एक मत मांडले, ”आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत. मोदींनी कधी स्वतंत्र लढ्यात भाग घेतला होता का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.