जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड, T20 Cricketमध्ये 250 विकेट घेणारा ठरला पहिला भारतीय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आपल्या नावावर एका खास रेकॉर्डची नोंद केली आहे. T20 क्रिकेटमध्ये (T20 cricket) 250 विकेट घेणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.या 250 विकेट्समध्ये आंतरराष्ट्रीय आणि साखळी सामन्यांच्या विकेट्सचाही समावेश आहे. हैदराबादचा फलंदाज वॉशिंग्टन सुंदरला क्लीन बोल्ड करत त्याने हा रेकॉर्ड (T20 cricket) आपल्या नावावर केला आहे.

यॉर्कर स्पेशालिस्ट बुमराहला ही कामगिरी करण्यासाठी 206 टी-20 सामने (T20 cricket) खेळावे लागले. त्याने मुंबई इंडियन्स, गुजरात तसेच भारतासाठी खेळलेल्या T20 सामन्यांमध्ये (T20 cricket) मिळून त्याने हि कामगिरी केली आहे. बुमराहच्या खालोखाल भुवनेश्वर कुमारचा क्रमांक लागतो, ज्याच्या नावावर 223 विकेट्स आहेत. त्याच्यापाठोपाठ 201 बळींसह जयदेव उनाडकट तिसऱ्या क्रमांकावर आणि 194 बळींसह चौथ्या क्रमांकावर विनय कुमार आहे. त्याचबरोबर इरफान पठाण 173 विकेट्ससह या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

बुमराहने हैदराबादविरुद्ध 4 षटकांत 32 धावा देऊन एक विकेट घेतली. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर असलेल्या मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादच्या अडचणीतही वाढ केली आहे. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजयाची नोंद केली असली तरी मुंबईने हैदराबादचे काम बिघडवले आहे. या सामन्यात जरी हैद्राबादचा विजय झाला मात्र त्यांना हा सामना मोठ्या फरकाने जिंकता नाही आला. त्यामुळे हैद्राबादचा प्ले ऑफमध्ये जाण्याचा मार्ग अधिक खडतर झाला आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब

Leave a Comment