हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बीसीसीआय़ने नुकताच श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. त्याअगोदर भारतासाठी एक गूड न्यूज समोर आली आहे. या मालिकेअगोदर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह फिट झाला असून तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो खेळणार आहे.
बुमराह बऱ्याच काळापासून दुखापतीने त्रस्त होता. आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. निवड समितीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) श्रीलंकेविरिुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत निवडले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीआधी भारतासाठी हि दिलासादायक बाब आहे.
श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.
हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?