स्वातंत्र लढ्यापासून ज्यांनी फारकत घेतली, तेच आता आम्हाला देशप्रेमाचे धडे देत आहेत- जावेद अख्तर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
”देशातील युवक आज बेचैन आहे. ३६ विद्यापीठे खदखदत आहे. भाजप हा देशातील अनोखा पक्ष आहे. इतर राजकीय पक्षांच्या अनेक शाखा असताना मात्र भाजप हीच एक शाखा आहे. अशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत मुस्लिम लिग आणि आरएसएस, हिंदू महासभा हे एकमेकांची भीती दाखवून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्नात होते. हे सगळे इंग्रजांचे एजंट होते” असा आरोप करत जेष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी भाजपवर टीका केली आहे. ते कोल्हापूरात बोलत होते. कॉ.गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त शाहू स्मारक येथे श्रमिक प्रतिष्ठानतर्फे जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जावेद अख्तर आणि डॉ. गांधी यांनी ‘भारत नव्या स्वातंत्र्य लढ्याच्या उंबरठ्यावर’ या विषयावर व्याख्यान दिले.

आपल्या व्याख्यानात अख्तर पुढे म्हणाले, ”स्वातंत्र लढा टिपेला पोहोचला असताना चले जाव चळवळीच्या विरोधात मुस्लिम लिग आणि आरएसएस दोघांनी काम केले. याचे बक्षीस म्हणून बॅरिस्टर जीना यांना पाकिस्तान मिळाला. नेहरू-गांधी आरएसएसच्या आडवे आले. याचा अजूनही यांच्या मनात राग आहे. ज्यांनी स्वातंत्र लढ्यापासून फारकत घेतली, तेच आता तुम्हा आम्हाला देशप्रेमाचे धडे देत आहेत. तुम्ही भारतीय आहात काय? म्हणून सवाल करीत आहेत. असा घणाघात जेष्ठ कवी जावेद अख्तर यांनी आरएसएस आणि भाजप सरकारवर केला.

जावेद अख्तर यांच्या व्याखानापूर्वी ‘चाय वाले की दुकान’ ही अर्धा तासाची नाटिका सादर करण्यात आली. तसेच मिलिंद मुरूगकर यांच्या ‘सीएए आणि एनआरसी म्हणजे काय? या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हमिद दाभोलकर, उमा पानसरे, दिलीप पोवार, मेघा पानसरे, एस. बी पाटील, डॉ. एन. डी. पाटील, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

You might also like