हॉस्पिटलमध्ये जयकुमार गोरेंनी पाहिली पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

Jayakumar Gore watched PM Modi's 'Mann Ki Baat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

फलटण येथील पुणे- पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या अपघातानंतर त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. या दरम्यान त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन कि बात’च्या माध्यमातून साधलेला संवाद टीव्हीवरून पाहिला.

जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाल्याने त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते राजकीय व कोणत्याच कार्यक्रमाला हजेरी लावू शकत नाहीत. मात्र, त्यांनी आज पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी याची ‘मन की बात’ हॉस्पिटलमधून टीव्हीच्या माध्यमातून पाहिली.

शरीरावर अनेक ठिकाणी मार लागलेला असताना देखील आमदार गोरे मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम पूर्णवेळ पाहतात. हे पाहून भाजपा कार्यकर्त्यांना वेगळी ऊर्जा मिळाल्या शिवाय राहणार नाही.

रणजितसिह निंबाळकरांनी केलं ट्विट

काल अपघात घडल्यानंतर रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना सुद्धा आमदार जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम पाहिला. यावेळी सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आणि मीही उपथित होतो, असे ट्विट खासदार रणजितसिह निंबाळकर यांनी केले आहे.