हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) विचार करतो तेव्हा जर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राज्यात आल्यास मुख्यमंत्रीपदी अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यातील कोणीतरी असेल असा विचार आपल्या मनात येईल. मात्र मुंबईत सगळीकडे जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या बॅनर्सवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने चर्चाना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांचा उद्या म्हणजे 16 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त कार्यकर्त्यांकडून मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. बॉस, माझं दैवत भावी मुख्यमंत्री, वाढदिवसाच्या शुभेच्छा असा मजकूर बॅनरवर दिसत आहे. जयंत पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर हे पोस्टर लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मलबार हिल तालुका यांच्याकडून हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत खुद्द जयंत पाटील याना विचारलं असता मी अजून ते बॅनर्स बघितले नाही, प्रसारमाध्यमातून मला हे समजतंय . काही कार्यकर्ते उत्साहाच्या भरात काहीतरी करतात. आपण सगळीकडेच लक्ष्य दिले पाहिजे असं काही नाही. मी कधी कोणाला बॅनर्स लावायला सांगत नाही असं जयंत पाटील यांनी म्हंटल.