हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी सर्वसामान्य करदात्यांना कोणताही नव्याने दिलासा देणारी घोषणा केली नाही. हा अर्थसंकल्प ‘अर्थसंकल्प नव्हे तर निवडणूक संकल्प!’ आहे, अशी टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत आजच्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प!, असे ट्विट पाटील यांनी केले आहे.
अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प!#Budget2022
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 1, 2022
दरम्यान यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधत टीका केली. देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. येत्या काही दिवसांत निवडणुकीसाठी मतदान सुद्धा होणार आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हा अर्थसंकल्प सादर केला असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी म्हंटले.