मुंबई : हॅलो महाराष्ट्र – विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांसह विजयी झाले आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. यावेळी एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकर यांच्या आजवर केलेल्या कामांचा दाखला दिला. याच दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी नरहरी झिरवळ यांच्यासुद्धा कामाचे कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी “आदिवासी असून देखील नरहरी झिरवळ यांनी चांगलं काम केलं” असे विधान केले. यानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेत हे विधान अनावधानाने आल्याचे सांगितले.
विधानसभेचे उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळ हे आमच्या पक्षाचे आदिवासी समाजाचे अत्यंत महत्वाचे नेते आहेत, आदिवासी समाजातून येऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत ते राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत, याचा मला कायम अभिमान आहे. pic.twitter.com/H74onC1RZU
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 3, 2022
यादरम्यान जयंत पाटील (Jayant Patil) यांनी झिरवळ यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर, सोशल मीडियातूनही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. “सत्ता गेली पण माज जात नाही” असे म्हणत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट केलं आहे. “आदिवासी असूनही चांगलं काम केलं या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रुजलेला आहे. मी तमाम दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहीर निषेध करतो. सत्ता गेली पण माज जात नाही” अशी घणाघाती टीका पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे.
यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांची ही चूक निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, जयंत पाटील यांनी, आपलं हे विधान अनावधानाने आलं असून आपला तसा हेतू नव्हता, असे म्हंटले आहे. तसेच, हे विधान रेकॉर्डवर घेऊ नये, अशी विनंतीसुद्धा जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. यानंतर जयंत पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुनही यासंदर्भात माहिती दिली आहे.
हे पण वाचा :
“साहेब मुंबईत बॅनरवर तुमचा फोटो ठेवणारा पहिला माणूस मी”; ‘या’ बंडखोर आमदाराचा व्हिडिओ व्हायरल
सत्ता गेली पण माज काही केल्या जात नाही…; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका
फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन अजुन रडतायत; अजितदादांची जोरदार फटकेबाजी
औरंगाबादच्या नामांतरावरून अबू आझमी आक्रमक; सभागृहातच ‘मविआ सरकार’ वर हल्लाबोल
अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर आमच्या कानात सांगा…; मुनगंटीवारांनीही साधला निशाणा