सांगली | महानगर पालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आले. सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचा पराभव अंतर्गत बंडखोरीमुळेच झाला असल्याचे पाटील यांनी यावेळी म्हणले आहे. आम्ही निवडणुकीत तिकीट न दिल्याने पक्षाच्या काहींनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्यातूनच आमचा पराभव झाला असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहे.
- अशोक चव्हाण होणार २०१९ ला मुख्यमंत्री
- जळगाव आणि सांगलीत यश मिळवल्याबद्दल मोदींनी केले फडणवीसांच्या कामाचे कौतुक
भाजपाच्या मतांची टक्केवारी ३४% असून कॉग्रेस आघाडीला ३७% मते पडली आहेत. याचाच अर्थ लोकांनी आघाडीला स्वीकारले आहे. तर बंडखोर उमेदवारांना १०% मते मिळाली आहेत. याचाच अर्थ बंडखोरी झाली नसती तर आम्ही सत्ता राखली असती असे जयंत पाटील म्हणाले.
निवडणुकीत पराभूत झाल्यावर विरोधकांनी मतदान यंत्रात घोळ केला, पैसे वाटले असे जुमले करतात या चंद्रकांतदादा पाटलांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांनी चांगलाच समाचार घेतला. मतदान यंत्रातील घोटाळा, पैसे वाटप या सार्या चंद्रकांत पाटलांच्याच मनातील गोष्टी असून आम्ही त्याबद्दल काहीच विधान केलेले नाही असे जयंत पाटील म्हणाले.