बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं; जयंत पाटलांचा पडळकरांना टोला

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करत असतात. याचवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पडळकरांवर टीका केली आहे. बिरोबा बनात येऊन बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं, असा टोला जयंत पाटील यांनी पडळकरांना लगावला. कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे ढालगाव वितरिकेच्या कामाची पाहणी व जलपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, आरेवाडीतील बिरोबा देवस्थान जागृत आहे. बिरोबाचा आशीर्वाद घेतल्यावर अनेक गोष्टी चांगल्या देखील होतात. पण बिरोबा बनात येऊन बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं, अस म्हणत त्यांनी पडळकरांवर निशाणा साधला. काही वर्षांपूर्वी पडळकरांनी घेतलेल्या शपथेची त्यांनी आठवण करून दिली.

यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याचा सल्ला भाजप कार्यकर्त्यांना दिला होता. यावर जयंत पाटील म्हणाले, चंद्रका़त पाटील यांचा हा सल्ला निराशेतून आलेला आहे. गेले काही महिने हे सतत सरकार जाईल, अशी वक्तव्ये करत होते. मात्र, सरकार भक्कम असल्याचे आता लोकांच्याही लक्षात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here