सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी – आ. जयंत पाटील

0
36
Jayant Patil NCP
Jayant Patil NCP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प राज्यात आले खरे परंतू त्यासाठी घेतलेले कर्ज आता आपल्या राज्याच्या माथ्यावर आदळणार आहे तेव्हा सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी असे वक्तव्य करत विधिमंडळ गटनेते आ.जयंत पाटील यांनी सरकारवर निशाना साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत सरकारच्या नाकर्तेपणाचा समाचार घेतला.

अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, जनतेचा झालेला भ्रमनिरास दाखवण्यासाठीच हा प्रस्ताव मांडत आहोत. राज्याच्या डोक्यावर पाच लाख कोटींहून अधिक कर्ज झाले आहे. मात्र हे सरकार जनतेवर जाहिरातींचा भडिमार करत आहे. बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प आणला मात्र त्यासाठी घेतलेले कर्जही आपल्या राज्याच्या माथ्यावर येऊन आदळणार आहे असे म्हणत या सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी एक शेवटची जाहिरात करावी असा टोला पाटील यांनी भाषणा दरम्यान राज्य सरकारला लगावला.

२०१८ मध्ये रुपयाचे प्रचंड अवमूलन झाले आहे. ६० हजार कोटींचे कर्ज ८० हजार कोटींपर्यंत नेवून ठेवले आहे. देशाची अर्थव्यवस्था हे सरकार जसे हाताळत आहे त्यावरुन रुपया शंभरी गाठेल, अशी भीती पाटील यांनी बोलताना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here