महाविकास आघाडी सरकारबद्दल जयंत पाटलांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार हे आपल्या वरिष्टांमुळेच आले असल्याचा दावा तिन्ही पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आघाडी सरकार येण्यामागचे कारण सांगितले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज एकत्र सरकारमध्ये काम करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने आल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

शिवसेनेच्या नेत्यांकडून आघाडी सरकार टिकवायचे कि नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याची विधाने केली जात आहेत. अशात शिवसेना खासदारसंजय राऊत यांनी तर पुढील काळात मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्यानंतर आता राष्ट्रवादीकडूनही आघाडी सरकार आणण्यात शरद पवार यांचा पुढाकार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आघाडी सरकार आणण्यामागे शरद पवारांचा पुढाकार असल्याचे म्हंटले आहे.

मंत्री पाटील कार्यक्रम प्रसंगी म्हणाले की, “लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असायला हवा. सरकार म्हणून आपल्याला संपूर्ण मदत होईल. शरद पवार साहेबांसारखं नेतृत्व पक्षाला मिळालं आहे. साहेबांनी केलेल्या झंझावाती दौर्‍यामुळे पक्षांसह आघाडीतील इतर पक्षांना मदत झाली. आता शिवसेना आपल्यासोबत आहे. त्यामुळे त्यांच्या सोबतीने आपल्याला आघाडीचे काम करायचे आहे. आघाडी सरकार टिकण्यामागे शरद पवार यांचे मोलाचे सहकार्य आहे.

Leave a Comment