तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे जर माढ्यातून निवडणूक लढले असते तरी त्यांचे डीपॉझीट जप्त करून दाखवले असते, असा खोचक टोला जयसिंह मोहिते पाटील यांनी लगावला आहे. सहकार महर्षी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातीलच उमेदवार असावा, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. दुष्काळी भागासाठी कृष्णा–भीमा स्थिरीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे माळशिरस, सांगोला व पंढरपुरचा पाणी प्रश्न सुटणार आहे. हे करण्यासाठी विधानसभेला तालुक्यातीलच उमेदवार देण्याची गरज असल्याचं मोहिते पाटील म्हणाले.

शरद पवार माढ्यातून लोकसभेची उमेदवारी करणार होते. मात्र त्यांनी ती उमेदवारी मागे घेतली कारण येथील लोकच त्यांना नाकारू लागले होते. तसेच त्यांचेच सहकारी त्यांचा पराभव घडवून आणण्यासाठी टपले होते. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी आपली ऊमेदवारी मागे घेतली. शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर मोहिते पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश केला.