‘या’ दिवशी लाँच होणार गुगल आणि जिओ यांचा 5G स्मार्टफोन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. हि सभा आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांमधून पार पडली आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी संवाद साधला.

या सभेच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्यासह आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि नीता अंबानी यांनी कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली होती. तसेच या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. या सभेमध्ये रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची घोषणा केली आहे.

येत्या गणेश चतुर्थीला म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी हा फोन लाँच करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन जिओ आणि गुगलने एकत्र मिळून डेव्हलप केला आहे. हा फोन भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन असल्याचे बोलले जात आहे. या फोनमध्ये कस्टम अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम देण्यात येणार आहे. हे ऑपरेटिंग सिस्टम एन्ट्री लेवल स्मार्टफोन्ससाठी वापरले जाते.

You might also like