हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडून ग्राहकांसाठी नेहमीच आकर्षक प्लॅन लाँच केले जात असतात. आताही या कंपनीने एक उत्तम प्लॅन आणला आहे. कमी किंमतीत अनलिमिटेड डेटा हवा असलेल्या ग्राहकांसाठी हा खास प्लॅन आहे. कंपनीकडून Jio Fiber युझर्ससाठी हा प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे. या प्लानचे नाव बॅक-अप प्लॅन असे आहे. यामध्ये फक्त 198 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट मिळेल.खास टाटा IPL साठी हा प्लॅन लाँच केला गेला असल्याचे कंपनीने म्हंटले आहे. आतापर्यंत Jio Fiber कनेक्शनची किमान किंमत 399 रुपये प्रति महिना होती.
ग्राहकांना या प्लॅनमध्ये 10Mbps ते 100Mbps पर्यंतचा स्पीड निवडण्याचा पर्याय देखीलमिळेल. 30 मार्चपासून हा रिचार्ज उपलब्ध असेल. जिओच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती देताना सांगितले की,” ग्राहकांची नेहमी ‘कनेक्ट’ राहण्याची गरज आम्हाला समजते. JioFiber बॅकअपला पर्याय म्हणून घरांना विश्वसनीय ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी ऑफर करण्याचे आमचे ध्येय आहे.”
198 रुपयांमध्ये मिळतील अनेक सुविधा
या प्लॅनमध्ये, ग्राहकांना दरमहा फक्त 198 रुपयांमध्ये 10Mbps स्पीडने अनलिमिटेड इंटरनेट मिळेल. याशिवाय जिओ फायबरच्या ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लँडलाइन कॉलिंग देखील उपलब्ध असेल. यासोबतच वन क्लिक स्पीड अपग्रेड सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांना एक, दोन किंवा सात दिवसांसाठी अपग्रेड देखील करत येईल. यासाठी ग्राहकांना अनुक्रमे 21 रुपये, 31 रुपये आणि 101 रुपये खर्च करावे लागतील. तसेच जर ग्राहकांनी 100Mbps स्पीडमध्ये अपग्रेड केले तर त्यांना 1 दिवसासाठी 32 रुपये, दोन दिवसांसाठी 52 रुपये आणि 7 दिवसांसाठी 152 रुपये मोजावे लागतील.
हे लक्षात घ्या कि, या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना OTT सबस्क्रिप्शन आणि फ्री सेट टॉप बॉक्स देखील मिळत आहेत. हा प्लॅन 5 महिन्यांसाठी 1490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यामध्ये 5 महिन्यांसाठी 990 रुपये, तर इन्स्टॉलेशन चार्ज 500 रुपये आहे. या प्रकरणी या प्लॅनची मासिक प्रभावी किंमत 198 रुपये होईल. मात्र, एका महिन्यासाठी 198 रुपये भरून हा प्लॅन घेता येणार नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/recharge/fiber/
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर