हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची कंपनी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकबरोबर एक मोठा करार केला आहे.या करारानुसार फेसबुक रिलायन्स जिओमध्ये १० टक्के हिस्सा ४३,५७४ कोटी रुपयांमध्ये खरेदी करेल.या करारामुळे आरआयएलला आपला कर्जाचा बोजा कमी करण्यास आणि फेसबुकमधील भारताची स्थिती मजबूत करण्यास मदत होईल.फेसबुकच्या गुंतवणूकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मचे मूल्यांकन ४.६२ लाख कोटी रुपये इतके होईल. भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात एफडीआय अंतर्गत झालेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
जाणून घ्या जिओने आतापर्यंत कोणकोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे …
रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी फेसबुकचे दीर्घकालीन भागीदार म्हणून स्वागत केले आहे. फेसबुकशी झालेल्या या करारामुळे भारताचे डिजिटल इंडियाचे ध्येय पूर्ण होईल,असे त्यांनी म्हटले आहे.त्याच वेळी फेसबुकचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी मुकेश अंबानी यांचे या जिओ डीलबद्दल आभार मानले आहे.त्यांनी म्हटले आहे की जिओने ४ वर्षापेक्षा कमी कालावधीत भारतात डिजिटल क्रांती घडविली आहे. ते म्हणाले की, ते भारतातील अधिकाधिक लोकांना जिओशी जोडतील.
छोट्या उद्योजकांना लाभ होणारा जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअॅपमधील हा करार जिओ मार्ट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिलायन्स रिटेलचा व्यवसाय वाढविण्यासाठी करण्यात आला आहे. यासाठी रिलायन्स रिटेल फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपची सेवा घेण्यास सक्षम असेल आणि व्हॉट्सअॅप आणि इतर मेसेंजर सेवांच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्या घरी ऑर्डर घेतील आणि वस्तू पुरवतील.
जिओने या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत-
> Haptik-Haptik एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) ऑफर करणारी एक स्टार्टअप आहे. जिओने मागील वर्षी या कंपनीतील ८७ टक्के भागभांडवल सुमारे ७०० कोटींमध्ये खरेदी केले होते. Haptik चे तंत्रज्ञान जिओला Amazon Alexa, Microsoft Cortana आणि Google Assistant बनविण्यात मदत करू शकते.
> Saavn- २०१८ मध्ये रिलायन्स जिओने सावन म्युझिक स्ट्रीमिंग अॅप विकत घेतले आणि ते JioMusic सह एकत्रित केले गेले. जिओने Gaana, Spotify, Amazon Music आणि Apple Music याना टक्कर देण्यासाठी सावनमध्ये सुमारे ७२० कोटी रुपयांचा हिस्सा विकत घेतला.
> Den, Datacom आणि Hathaway- जियो यांनी Den Networksमधील ६६ टक्के भागभांडवल २,०४५ कोटी रुपये आणि Hathway Cable आणि Datacom मधील ५१.३ टक्के भागभांडवल २,९४० कोटी रुपयांना खरेदी केले. या गुंतवणूकीमुळे जिओला होम ब्रॉडबँड JioFibre ला रोल आउट करण्यास मदत झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.