पवारांच्या निवृत्तीनंतर जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा; राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. आज शरद पवारांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये, जनमताचा आदर केला पाहिजे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटल. आम्हाला विश्वासात न घेता त्यांना तडकाफडकी राजीनामा देण्याचा अधिकार नाही. लोकशाहीमध्ये लोकांचं ऐकलं पाहिजे. लोकांचा जो कल आहे त्यानुसार नेत्याने वाटचाल केली पाहिजे. लोक जी भूमिका घेतात त्या सोबत राहील पाहिजे असा आग्रह शरद पवार यांचा असतो, त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये हा आमचा आग्रह आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटल.

दरम्यान, मुंबईतील वायबी सेंटरवर आज राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची बैठक सुरु आहे. शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल यावर चर्चा रंगत आहेत. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाच्या चर्चा सुरु आहेत अशाही बातम्या चालल्या होत्या. तर राष्ट्रीय स्तरावर सुप्रिया सुळे आणि राज्याच्या राजकारणात अजित पवार अशा चर्चाही सुरु आहेत.