मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभा राहिलो तरी पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील; आव्हाडांचा ट्वीटद्वारे टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज काही योजनांचा शुभारंभ केला जाणार आहे. महापालिकेकडून या कार्यक्रमाचे आमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आले आहे. यावरून आव्हाड यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. “आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे. आज त्यांच्या बाजुला उभा राहिल्यास पोलिस माझ्यावर पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील, असे आव्हाड याणी म्हंटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील कार्यक्रमांचे आमंत्रण नाकारले असून त्यांनी नुकतेच एक ट्विट करत या कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्याना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे आमंत्रण दिले महापालिकेनी पण ब्रिज च्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला ते स्वतः साक्षीदार आहेत.

आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील. त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेले बर. परत पोलिस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही .. तुला कस कळत नाही … खरच कळत नाही ….. चलो ये वक्त भी गुजर जायेगा, असे ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हंटले आहे.

ठाण्यात यापूर्वी नेमकं काय घडले होते?

काही दिवसांपूर्वीच मुंब्रा येथे एका उड्डाणपूलाचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वाहनाजवळ आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप भाजपाच्या एका महिला पदाधिकारीने केला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना अटकही झाली होती.