हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना रुतली असा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केसरकरांवर निशाणा साधला आहे. “ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?” असा प्रश्न विचारत आव्हाड यांनी केसरकरांवर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत केसरकरांवर निशाणा साधला असून त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहार की, “अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात. 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका,” असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले
ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात
2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन
जिथे आहात तिथे सुखी राहा
खाजवून खरूज काढू नका— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 13, 2022
पवारांबद्दल केसरकर नेमकं काय म्हणाले?
काल दीपक केसरकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले होते की, “मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे”, असे केसरकरांनी म्हंटले होते.