हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवाब मलिक प्रकरणा नंतर भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम यांच्याशी जोडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक विडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी पवारांचे कौतुक करत शरद पवारांनी आपल्या हिमतीने मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवले असे म्हंटल आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मोदींचा हा विडिओ शेअर करत विरोधकांना सुनावले आहे. आव्हाड म्हणाले, अंडरवर्ल्ड अन शरद पवारांबद्दल पंतप्रधान मोदीजी हे काय बोलत आहेत ? ज्यांना समजेल त्यांनी वाचावे बाकीच्यांनी बक बक चालू ठेवावी असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला
अंडरवर्ल्ड अन शरद पवारांबद्दल पंतप्रधान मोदीजी हे काय बोलत आहेत ?
ज्यांना समजेल त्यांनी वाचावे बाकीच्यांनी बक बक चालू ठेवावी pic.twitter.com/bOpBATgiTT— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 13, 2022
मोदी नेमकं काय म्हणाले होते
‘एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून शरद पवार यांची सर्वत्र ओळख होती. मुंबई, जे आपल्या आर्थिक जीवनाला गती देणारं शहर आहे. एक काळ असा आला, जेव्हा अंडरवर्ल्डने या मुंबईतील जनजीवन एकप्रकारे उद्ध्वस्त करून टाकलं. अंधकारमय वातावरण निर्माण झालं होतं की, जर मुंबई अंडरवर्ल्डच्या हातात गेली तर काय होणार? मी सांगतो शरद पवार यांची हिंमत आणि कौशल्य होतं की, त्यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं. बाहेर काढलं. हे त्यांचं सामर्थ्य होतं”, असं मोदी म्हणालेले आहेत.