हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे, चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध असं त्यांनी म्हंटल आहे.
याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हंटल, महाराष्ट्रात भाजपा नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झाल्याचं वाटत आहे. एकापाठोपाठ एक महापुरुषांची बदनामी करणारी व्यक्तव्य येत आहेत. अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील. चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध..! यासोबत आव्हाड यांच्या भाषणाची क्लिपसुद्धा शेअर केली आहे.
महाराष्ट्रात भाजपा नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झालेली आहे असंच वाटत आहे.
एकापाठोपाठ एक महापुरुषांची बदनामी करणारे व्यक्तव्य येत आहेत.
अगोदर छत्रपती शिवाजी महाराज,
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील.
चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध..! pic.twitter.com/YpHB9O4zc8— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 9, 2022
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा कडक भाषेत समाचार घेतला. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेकर किंवा महात्मा फुले यांनी लोकवर्गणीतुन आणि स्वतःचे पैसे खर्च करून शाळा उभारल्या , त्यांनी भीक नाही मागितली. परंतु भीक हा शब्द वापरून चंद्रकांत पाटलांनी या तिन्ही महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यामुळे फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या सर्व जनतेने चंद्रकांत पाटलांचे विधान गांभीर्याने घ्यावं. चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदासाठी काय भीक मागितली हे महाराष्ट्राला माहित आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा फक्त निषेध करून चालणार नाही तर यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे असं अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मात्र आपल्या विधानावर सारवासारव केली आहे. मी चुकीचे असं काहीही बोललो नाही. फुले- आंबेड्करांबाबत मी लोकांना चांगली माहिती देत होतो. वेळप्रसंगी भीक मागून त्यांनी शाळा सुरु केल्या असं मी भाषणात म्हंटल. भीक म्हणजे देणगी किंवा वर्गणी असा त्याचा अर्थ होतो. मी चुकीचे असं काहीही बोललो नाही, विनाकारण वाद वाढवला जातोय असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले.