अभिनेता जॉन अब्राहमसह पत्नी प्रिया कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका अधिक जाणवत आहे. कोरोनाने राजकीय क्षेत्राबरोबर बॉलिवूड क्षेत्रातही शिरकाव केला आहे. बॉलिवूड पार्ट्यांमुळे कोरोनाचा अधिक प्रसार होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे. या दरम्यान आता अभिनेता जॉन अब्राहमसह पत्नी प्रिया हि देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.

विशेष म्हणजे अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया या दोघांनी दोन्ही लस घेतळी होती. तरी देखील या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जॉन अब्राहमने आपल्या इंट्राग्रामवर मला कोरोनाची लागण झाली असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यासह पत्नीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहे. तीन दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. नंतर त्या संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याचे समजले. यानंतर आम्ही चाचणी केली आणि त्यात आम्हा दोघांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. आम्ही सध्या घरीच क्वारंटाइन असून कोणाच्याही संपर्कात नाही. दोघांनीही लस घेतली होती, सध्या सौम्य लक्षणे आहेत. पण काळजी करण्याचं कारण नाही.’ तुम्हीही काळजी घ्या आणि मास्क घाला, असे आवाहन जॉन अब्राहमने केले आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. करिना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान, महिम कपूर यांच्यासह अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, रिया कपूर, तिचा पती करण बुलानी, नोरा फतेही, शिल्पा शिरोडकर यांना कोरोनाची लागण झाली.