हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जॉन्सन अँड जॉन्सन या प्रसिद्ध कंपनीने आपले लोकप्रिय उत्पादन असलेल्या जॉन्सन बेबी पावडरची अमेरिका आणि कॅनडामध्ये विक्री बंद करण्याची घोषणा नुकतीच केली आहे.
कंपनीने त्यांच्या उत्पादनांमध्ये एस्बेस्टोसची भेसळ केल्याप्रकरणी हजारो खटले दाखल झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. जॉन्सनच्या बेबी पावडरमुळे कर्करोग झाला असा दावा करत अनेक ग्राहकांनी जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीविरूद्ध १६,००० हून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत.
जॉन्सन अँड जॉन्सन यांनी याबाबत माहिती देत म्हटले आहे की,’ ग्राहकांच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे आणि जॉन्सन बेबी पावडर विषयीची चुकीची माहिती पसरल्यामुळे उत्तर अमेरिकेमध्ये या उत्पादनांची मागणी घटते आहे.
या खटल्याच्या संदर्भात कंपनीला वकीलांच्या वतीने वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोना साथीच्या या काळात ग्राहक उत्पादनांचे पुनर्मूल्यांकन करण्याच्या हालचालीचा हा भाग असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका अहवालानुसार, जॉन्सन अँड जॉन्सन यांनी असे नमूद केले आहे की,’ येत्या काही महिन्यांमध्ये यामुळे आमच्या उत्पादनांची विक्री कमी होईल. मात्र किरकोळ विक्रेते हे सध्या या उत्पादनांची विक्री सुरूच ठेवतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.