उल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा

0
69
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । राज्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काही जागांवर मनसेला पाठिंबा दिला आहे. त्याप्रमाणे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात मनसेच्या पाठींब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती कलानी यांची बाजू मजबूत झाली आहे. कलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे. सोमवारी रात्री उशिरा मनसे पदाधिकारी आणि ज्योती कलानी यांचे पुत्र ओम कलानी यांच्यातील बैठकीनंतर या पाठिंब्याचा निर्णय झाला. महानगरपालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेतलं जाईल असं ओम कलानी म्हणाले. तर भाजपचा पराभव करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here