कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर…

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढपूर प्रतिनिधी | पंढरपूरचे काँग्रेस नेते कल्याणराव काळे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. माढा मतदार संघातील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला हा दुसरा मोठा धक्क बसण्याची शक्यता आहे.

कल्याणराव काळे हे पंढरपुरातील तरुण नेते म्हणून ओळखले जातात. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी केली होती.कल्याणराव काळे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून ६५ हजार मते मिळवली होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्ष बदलला तर महाआघाडीच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते कल्याणराव काळे हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी असून दोन साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यामुळे आघाडीला माढा मतदार संघातील हा दुसरा मोठा धक्का असणार आहे.

संजय शिंदे यांचा राष्ट्रवादीतला प्रवेश आणि संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी भाजपला चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे संजय शिंदे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीतील नाराज नेत्यांना भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट

मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर

राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा

वसंतदादा घराण्याला संपविण्याचा प्रयत्न, विशाल पाटीलांचा जयंत पाटीलांवर हल्लाबोल

रणजीतसिंह मोहिते पाटिलांनंतर राष्ट्रवादीच्या या माजी खासदाराच्या मुलाचा भाजप प्रवेश