आमच्या राज्यात कुणालाच हरामखोर किंवा नमकहराम म्हटलं जात नाही ; कंगणाने पुन्हा साधला राऊतांवर निशाणा

0
48
kangana and sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणल्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगणाला उद्देशून हरामखोर हा शब्द वापरला होता. कंगना ते अजूनही विसरली नाही. आता मात्र कंगणाने संजय राऊत याना टोला लगावला आहे. आमच्या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला ‘हरामखोर’ अथवा ‘नमकहराम’ म्हटले जाणार नाही.

भूत या फिल्मचं शूटिंग हिमाचल प्रदेशमध्ये होणार आहे. त्यासाठी सैफ अली खान, जॅकलीन फर्नांडिस, अर्जुन कपूर मुंबईहून हिमाचल प्रदेशला रवाना झाले. त्यावरून कंगनाने आमच्या देवभूमीत मुंबईकर आलेत, पण त्यांना हरामखोर म्हटलं जात नाही, असं म्हणत सेनेला पुन्हा सणसणीत टोला लगावला आहे.

कंगना म्हणाली, मुंबईतील जास्तीत जास्त फिल्म युनिट्स सध्या हिमाचल प्रदेशमध्ये येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. देवभूमी ही प्रत्येक भारतीयाची आहे आणि कुणीही इथं पैसे कमवू शकतो. या राज्यात कुणालाच हरामखोर किंवा नमकहराम म्हटलं जात नाही आणि कुणी तसं केलं तर मी त्याचा निषेध करेन, बुलिवूडसारखं गप्प राहणार नाही”

संजय राऊत काय म्हणाले होते

कंगना रणौत ने गेल्या महिन्यात सुशांत सिंह राजपूत केसवरून मुंबई पोलिसांवर टीका केली होती. एवढेच नाही, तर तिने संजय राऊतांवर तिला मुंबईमध्ये न येण्याची धमकी देण्याचा आरोपही केला होता. तसेच मुंबईची तुलना POK सोबत केली होती. यानंतर, कंगनाच्या ट्विटवरून भडकलेल्या संजय राऊतांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला हरामखोर मुलगी, असे म्हटले होते. या वक्तव्यावर चहू बाजूंनी राऊतांवर टिका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना हरामखोरचा अर्थ नॉटी, असा सांगितला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here