“अग्निपथ योजनेचे लॉलीपॉप दाखवायचं बंद करा”; काँग्रेस नेत्याचा केंद्र सरकारवर निशाणा

0
48
Congress Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने नुकतीच एक महत्वपूर्ण योजनेची घोषणा केली ती म्हणजे अग्निपथ योजना होय. या योजनेवरून देशभरात तरुणांकडून आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. दरम्यान आज काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनीही या योजनेला कडाडून विरोध केला असून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “अग्निपथ योजना आणण्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील तरूणांशी संवाद साधणे गरजेचे होते. आता सरकारने हि योजना तत्काळ मागे घ्यावी आणि लॉलीपॉप दाखवायचे बंद करावे, असे कन्हैय्या यांनी म्हंटले आहे.

कन्हैया कुमार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी कुमार म्हणाले की, “केंद्र सरकारने अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे. आणि अगोदर अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी, सरकारने लॉलीपॉप दाखवायचेही बंद करावे. सैन्यात जाणारे गरीब, शेतकरी, कष्टकरी असतात, राजकीय नेत्यांची मुले सैन्यात जात नाहीत, असे कुमार यांनी म्हंटले.

महाराष्ट्रातही आंदोलनाचे उमटणार पडसाद

अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी देशभरातील तरूण रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन सध्या आणखी धारदार होत आहे. अशात आता महाराष्ट्र राज्यातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. युवक राष्ट्रवादीही याबाबत आक्रमक झाली आहे. राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा युवक राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here