मुंबई : हॅलो महाराष्ट्र – IPL स्पर्धेत पदार्पण करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) अजून संधी मिळालेली नाही. अर्जुन मागील सिझनपासून मुंबई इंडियन्सबरोबर आहे. मुंबईनं या सिझनमध्ये ऋतिक शौकीन ते कुमार कार्तिकेयपर्यंत अनेकांना पदार्पणाची संधी दिली मात्र अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मात्र अजून संधी मिळालेली नाही. यावेळी मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बॉन्डनं अर्जुनला कौशल्य विकसित करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता महान भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी अर्जुनला मोलाचा सल्ला दिला आहे.
काय म्हणले कपिल देव
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून सर्वजण त्याच्याबद्दल बोलत आहेत का? त्याला त्याचं काम करू द्या. त्याची तुलना सचिनशी करू नका. तेंडुलकर नावाचे फायदे आणि तोटे देखील आहेत. ब्रॅडमनच्या मुलानं त्याचं नाव बदललं. कारण तो त्या नावाचा दबाव झेलू शकला नाही. त्यानं वडिलांसारखंच व्हावं अशी सर्वांची अपेक्षा होती. अर्जुनवर दबाव टाकू नका. तो एक तरूण खेळाडू आहे. महान क्रिकेटपटू सचिन त्याचे वडील आहेत. तर आपण त्याला सांगणारे कोण आहेत. तरीही मी त्याला सांगू इच्छितो की, मैदानात जा आणि खेळाचा आनंद घे. काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तो सचिनच्या 50 टक्के जरी बनला तरी त्याच्यापेक्षा चांगलं काहीही नसेल. सचिन अत्यंत महान होता. त्यामुळे तेंडुलकर नाव आलं की आपल्या अपेक्षा वाढतात,’ असे कपिल देव यांनी सांगितले आहे.
मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच शेन बॉण्ड यांनी अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) या मोसमात का खेळवलं नाही, याचं कारण सांगितलं आहे. बॅटिंग आणि फिल्डिंग सुधारण्यासाठी अर्जुनला अजून बरंच ट्रेनिंग आणि कठोर परिश्रम करावे लागणार आहेत, असं शेन बॉण्ड यांनी सांगितले आहे. ‘अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) अजूनही बरंच काम करावं लागणार आहे. तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या टीमकडून खेळता तेव्हा स्क्वॅडमध्ये असणं वेगळं आणि प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं वेगळं. त्याला अजून बरंच सुधारावं लागणार आहे. त्याच्यावर अजून बरंच काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाला संधी दिली पाहिजे असं आपण म्हणतो, पण या लेव्हलला तुम्हाला तुमची जागा सिद्ध करून मिळवावी लागते. त्याला बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तो यात सुधारणा करेल आणि टीममध्ये स्थान कमवेल, अशी अपेक्षा आहे,’ असे शेन बॉण्ड म्हणाले आहेत.
हे पण वाचा :
अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!
कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र
मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!
मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान
आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा