सकलेन मुलाणी । कराड
कराड :- कराडचे डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी शनिवारी कऱ्हाडकरांनी एकत्र येवुन मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. तेथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन बदली तातडीने रद्द करावी अशी मागणी करण्यात आली.
डीवायएसपी गुरव यांनी कराड शहरातील कायदा व सुव्यवस्थेची चांगली अंमलबजावणी केली. त्यांनी शहरातील व कराड तालुक्यातील गुंडरिगी संपवण्यासाठी त्यांचे सहकारी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील, किशोर धुमाळ यांच्या मदतीने प्रयत्न केले. मात्र त्यांचा कराड येथील कामाचा कार्यकाळ पुर्ण होण्याअगोदरच बदली झाली. त्यामुळे कराडकर संतप्त झाले आहेत. त्यांनी या राजकीय हस्तक्षेपातुन झालेली बदल तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी शनिवारी कऱ्हाडमध्ये मोर्चा काढला. कराडच्या मध्यवर्ती असलेल्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चास प्रारंभ झाला.
त्यावेळी शहरातील प्रतिष्ठीतांनी मनोगत व्यक्त करुन डीवायएसपी सुरज गुरव यांनी केलेल्या चांगल्या कामाची अनेक उदाहरणे दिली. त्याचबरोबर त्यांनी बदली तातडीने रद्द न केल्यास होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहिल, असाही इशारा दिला. त्यानंतर मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. तेथे प्रांत अधिकारी उत्तमराव दिघे, कराड पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’