हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजपची सत्ता जाण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने 113 जागांची मॅजिक फिगर गाठली आहे.
कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सकाळी सुरू झाली. आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडण्यात आल्या.आत्तापर्यंत कर्नाटक विधासभेच्या २१८ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस ११३, भाजप ८४ आणि JDS २० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसने बहुमताचा टप्पा पार केला आहे असं म्हणता येईल.
यंदाच्या कर्नाटक निवडणुकीत JDS किंगमेकर ठरेल असं म्हंटल जात होते, मात्र सध्याचे कल पाहता काँग्रेस एकहाती सत्ता काबीज करू शकते असं दिसतंय. त्यामुळे किंगमेकर होण्याचे JDS चे स्वप्न भंग होण्याची चिन्हे आहेत. कर्नाटकात प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल पाहायला मिळाला आहे, यंदाही हाच ट्रेंड कायम राहील असं दिसतंय.
बेळगावच्या १८ मतदारसंघातील आकडेवारी पाहिली तर काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप ४ जागांवर आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला मात्र इथे पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. तर निपाणी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील आघाडीवर आहेत.