हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2024 ची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. नुकताच यंदाच्या आयपीएल सीजनसाठी सर्व खळाडूंचा लिलाव झाला असून आता संघ सुद्धा सज्ज झाले आहेत. IPL म्हंटल कि, सर्वात जास्त चर्चा रंगते ती चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) … गेल्या काही IPL सीजन दरम्यान ही धोनीची शेवटची आयपीएल असेल का? असा प्रश्न उपस्थित केला जायचा,आणि धोनीने प्रत्येक वेळी हा प्रश्न खोडून काढला आहे. आताही आयपीएल सुरु होण्यासाधीच धोनीची हा शेवटचा आयपीएल हंगाम असणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यावर चेन्नई सुपर किंग्जचे CEO यांनी काशी विश्वनाथ यांनी मोठं विधान केलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना काशी विश्वनाथ म्हणाले, यंदाचा आयपीएल हंगाम महेंद्रसिंह धोनीचा शेवटचा हंगाम असेल कि नाही ते मला माहित नाही. हा सर्वस्वी प्रश्न धोनीचा आहे. धोनी काय करणार आहे ते तो आम्हाला सांगत नाही. त्यामुळे धोनीच याचे योग्य उत्तर देईल. तसेच सध्या तरी धोनी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. कदाचित येत्या 10 दिवसांत, तो नेटमध्ये येऊन सराव करताना सुद्धा दिसू शकतो असेही काशी विश्वनाथ यांनी म्हंटल.
दरम्यान, येत्या 22 मार्च पासून यंदाच्या आयपीएलला सुरुवात होऊ शकते. चेन्नई सुपर किंग्सने नुकत्याच पार पडलेल्या लिलावात डॅरिल मिशेल (14 कोटी), राचिन रवींद्र (1.8 कोटी), शार्दुल ठाकूर (4 कोटी), समीर रिझवी (8.40 कोटी), मुस्तफिजूर रहमान (2 कोटी), अवनीश राव आर्वेली (20 लाख) या खेळाडूंना विकत घेतलं आहे. चेन्नईचा संघ पूर्णपणे संतुलित दिसत असून पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर करण्याचा संघाचा प्रयत्न असेल.
कसा असेल चेन्नईचा संघ –
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, राचिन रवींद्र, दीपक चहर, मुकेश चौधरी, रवींद्र जडेजा, मथिशा पाथीराना, मुस्तफिझूर रहमान, शेख रशीद, प्रशांत सोलंकी, तुषार देशपांडे, डॅरिल मिशेल, राजवर्धन हंगेरकर, समीर रिझवी, अजय मंडल, निशांत सिंधू, महेश तिक्षिना, अवनीश राव अरावली,