Sunday, April 2, 2023

दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नाही – अरविंद केजरिवाल

- Advertisement -

दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे याकरता आज दिल्ली विधानसभेत ठराव घेण्यात आला. यावेळी दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नसल्याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी केला.

- Advertisement -

दिल्ली विधानसभेत NRC आणि NPR विधेयक केंद्र सेकारने मागे घेण्यासंदर्भातील विधेयक बहुमताने मंजूर झाले. विधानभवनात कोणाकोणाकडे जन्माचा दाखला आहे असा प्रश्न केजरिवाल यांनी विचारला असता नऊ सदस्यांनी आपला हात वर केला. यानंतर दिल्ली विधानसभेच्या ७० सभासदांपैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नाही असे केजरिवाल म्हणाले. आता या सर्वांनाही डिटेंशन सेंटर मध्ये पाठवणार काय? असा सवालही केजरिवाल यांनी यावेळी केला.

दरम्यान देशात सध्या अनेक मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. देश आर्थिक अडचणीत सापडला आहे. युवकांना हाताला रोजगार नाही आहे. आणि अशात कोरोनामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तेव्हा केंद्र सरकारने या अतिमहत्वाच्या विषयांकडे लक्ष द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री केजरिवाल यांनी केले.