“आदी शंकराचार्य जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते”; केरळच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता केरळ सरकारमधील मंत्री आणि सीपीएम नेता एमबी राजेश यांनी आदी शंकराचार्यांबद्दल (adi shankaracharya) वादग्रस्त विधान केले आहे. आदी शंकराचार्य (adi shankaracharya) हे जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

काय म्हणाले एमबी राजेश?
सोमवारी वर्कला शिवगीरी मठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “केरळमध्ये कोणी आचार्य असेल तर ते श्री नारायण गुरू आहेत, आदी शंकराचार्य (adi shankaracharya) नाही. शंकराचार्य हे मनुस्मृतीवर आधारीत जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. मात्र, नारायण गुरू यांनी आयुष्यभर जाती व्यवस्थेविरोधात लढा दिला.” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

तसेच नारायण गुरू यांनी जाती व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या शंकराचार्यांवर (adi shankaracharya) टीका सुद्धा केली होती, असेदेखील ते यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती