Sunday, January 29, 2023

मैत्रीनीच्या मदतीने कारागृह राक्षकचे अपहरण करून टिप्याने घातला लाखोंचा गंडा; मैत्रिणीसह तिघे गजाआड

- Advertisement -

औरंगाबाद – शहरातील पुंडलीकनगरमध्ये गुन्हा केल्यानंतर फरार होण्यासाठी पैसे लागत असल्याने टिप्याने मैत्रिण आणि साथीदारांसह प्लॅन बनवीत लातूर येथील कारागृह राक्षकाचे अपहरण करून त्याचे प्लॉट बळजबरी नावे करून घेतले. एवढ्यावरच न थाम्बता फोन-पे द्वारे एक लाख रुपये उकळले.गुन्हे शाखेच्या तंत्रशुद्ध तपासून हा गुन्हा उघड झाला.पोलिसांनी तरुणीसह तिघाना अटक केली आहे. पोलीस टिप्याच्या शोध घेत आहे. शीतल चव्हाण, ( रा. जटवाडा रोड, हर्सूल), दीपक पाटील, अर्जुन पाटील (दोघेही राहणार शिवाजीनगर, गारखेडा) अशी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत.

या धक्कादायक घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, 17 तारखेला शेख जावेद उर्फ टिप्याने पुंडलीकनगर भागात पोलीस आणि महिला सुरक्षारक्षकांच्या अंगावर वाहन टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे कळताच टिप्या भूमिगत झाला होता.पोलीस आपल्याला पकडतील त्यासाठी बाहेरगावी जाण्यासाठी पैसे लागतील.त्यासाठी त्याने त्याची मैत्रीण शीतलशी संपर्क केला होता परंतु तिच्याकडे देखील पैशे न्हवते.मात्र पूर्वी हर्सूल कारागृहात कार्यरत असलेले आणि आता लातूरला कार्यरत असलेले कारागृह रक्षक सतीश तुकाराम उंबरहंडे वय-33 (रा.लातूर जिल्हा कारागृह वर्ग-1) यांची शीतलशी ओळखी होती.उंबरहंडे यांना गंडविण्याचा प्लान आरोपीनी आखला व ठरल्या प्रमाणे शीतल ने उंबरहंडे यांना प्लॉटची फेर लावण्याच्या बहाण्याने लातूरहून औरंगाबादला बोलावले. उंबरहंडे हे दुपारी सिडको एन-1 भागातील क्रेझी बाईट हॉटेलमध्ये आले. दरम्यान आरोपींनि तेथे चहा घेतला.व त्यानंतर आरोपीनी उंबरहंडे यांना चाकूचा धाक दाखवत त्यांचा आय-10 वाहनातून अपहरण केले. त्यांच्या खिशातील 15 हजार रुपये रोख काढून घेतले. व जीवे मारण्याची धमकी देत तुळजापूर शिवारातील गट क्र-53,प्लॉट क्र-152 हा प्लॉट बळजबरीने शीतलच्या नावे करून घेतले. त्यानंतर आरोपीनी उंबरहंडे यांची मुक्तता न करता त्यांच्याकडून 4 लाख 40 हजार रुपयांची खंडणी मागतील.मात्र त्यांच्याकडे पैशे नसल्याने बराचवेळ उंबरहंडे यांना आरोपीनी डांबून ठेवले.शेवटी एकच लाख रुपये देण्याचे ठरले.उंबरहंडे यांनी त्यांच्या परिचयाचे व्यक्तीकडून एक लाख रुपये शीतलच्या फोन- पे खात्यात ट्रान्स्फर केले.त्यानंतर कुणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकू अशी धमकी देत उंबरहंडे यांना आरोपीनी सोडून दिली आणि त्यानंतर टिप्या शहरातून पसार झाला. त्याचा शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

- Advertisement -

असा झाला प्रकरणाचा उलगडा
फरार असलेल्या टिप्याच्या शोधार्थ गुन्हेशाखेचे पथक मोबाईल लोकेशन आणि डेटाची पाहणी करीत असताना शीतल, अर्जुन आणि दीपक या तिघांच्या क्रमांकावर टिप्याने वारंवार संपर्क केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी बारकाईने तांत्रिक तपास केला असता या तिघांच्या संपर्कात कारागृह रक्षक असल्याचे समोर आले.प्रथमदर्शनी पोलीस आरोपीला सहकार्य तर करीत नाही ना? असा प्रश्न पोलिसांसमोर होता. नेमकं प्रकरण काय आहे हे माहीत करण्यासाठी पोलीस पथकाने उंबरहंडे यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली आणि पोलीस देखील चक्रावले. गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी पथकासह उंबरहंडे यांची भेट घेऊन सविस्तरपणे घटना जाणून घेतली.व बदनामीच्या भीतीपोटी पोलिसात तक्रार केली न्हवती अशी माहिती उंबरहंडे यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर मध्यरात्री एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात टिप्या तिची मैत्रीणसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक शेळके यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने तिन्ही आरोपिना अटक करण्यात आली.