किरण माने शरद पवारांची भेट घेणार ?? चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोशल मिडीयावर राजकारणाविषयी मत मांडल्यामुळे मराठी अभिनेते किरण माने यांची मराठी सिरीयल ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण देखील तापलं असून महाविकास आघाडीने किरण माने याना पाठिंबा दर्शवत भाजपवर हल्लाबोल केला. त्यातच आता किरण माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

किरण माने याना राजकीय विषयांवर भाष्य केल्यानंतर त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण राज्यात वाऱ्यासारखं पसरले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांनी किरण माने याना पाठिंबा दर्शवत भाजपवर टीका केली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असेही म्हंटल. या सर्व घडामोडीनानंतर किरण माने हे पवारांना भेटणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मात्र याप्रकरणी भाजपवर केलेले आरोप फेटाळले आहेत. एखाद्याला मालिकेतून काढल्यावरुन राजकारण करणे योग्य नाही. ‘स्टार प्रवाह’चे मालक, मालिकेचे दिग्दर्शक किंवा निर्मात्यांचा भाजपचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे हा ‘स्टार प्रवाह’ स्वतंत्र विषय आहे. किरण माने यांना मालिकेत पुन्हा घेतलं तरी आमची हरकत नाही. काढणं, ठेवणं हा सर्वस्वी ‘स्टार प्रवाह’चा अधिकार आहे, असे दरेकर यांनी सांगितले

You might also like